Site icon Aapli Baramati News

Breaking News : महाराष्ट्र राज्य लोकसेवा पूर्व परीक्षेची नवीन तारीख जाहीर

ह्याचा प्रसार करा

पुणे : प्रतिनिधी

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत राज्यसेवा पूर्व परीक्षा २ जानेवारी रोजी होणार होती. मात्र काही तांत्रिक अडचणींमुळे ही परीक्षा पुढे ढकलण्यात आली होती. आता आयोगाने या परीक्षेची नवीन तारीख जाहीर केली असून ही परीक्षा २३ जानेवारी रोजी होणार आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने राज्यसेवा पूर्व परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला होता. त्याबाबत प्रसिद्धीपत्रकही जारी केले होते. त्यानंतर आता नव्याने २३ जानेवारी रोजी या परीक्षा घेतल्या जाणार आहेत. या परीक्षा ऑफलाईन पद्धतीने परीक्षा केंद्रांवर होणार असल्याचे लोकसेवा आयोगाने स्पष्ट केले आहे.

परीक्षेसंदर्भात महत्वपूर्ण तपशील

२ जानेवारी २०२२ रोजी होणारी परीक्षा पूढे ढकलण्यात आली, जी आता २३ जानेवारी २०२२ रोजी होणार आहे. प्राथमिक परीक्षा विविध परीक्षा केंद्रांवर ऑफलाइन पद्धतीने घेतली जाणार आहे. प्राथमिक परीक्षेत पात्र ठरणारे उमेदवार  मुख्य परीक्षेला बसण्यास पात्र असतील. मुख्य परीक्षा ७, ८ आणि ९ मे २०२२ रोजी होणार आहे.

कसे कराल प्रवेशपत्र  डाउनलोड?

१- प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी सर्वप्रथम आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळावर जावे. (mpsconline.gov.in)

२ – संकेतस्थळाच्या  होम पेजवर भरतीवर क्लिक करा

३ – नंतर एमपीएससी राज्य सेवा प्रिलिम्स२०२१ परीक्षेच्या लिंक वर जावे .

४ – येथे प्रवेशपत्र डाउनलोड करण्याच्या लिंकवर आहात. आता उमेदवाराने त्याचा अर्ज क्रमांक आणि पासवर्ड टाकावा आणि सबमिट वर क्लिक करावे  प्रवेशपत्र स्क्रीनवर उघडेल. प्रवेशपत्र डाउनलोड करा आणि पुढील वापरासाठी प्रिंट आउट घ्यावी.

परीक्षेसाठी आले दोन लाखाहून अधिक अर्ज

महाराष्ट्र राज्य सेवा पूर्व परीक्षेसाठी एकूण २,५१,५८९  उमेदवारांनी अर्ज केले आहेत. राज्य शासनाच्या विविध विभागांमध्ये २९० पदांवर भरती होणार आहे. रिक्त पदांमध्ये उपजिल्हा दंडाधिकारी (गट अ), पोलिस उपअधीक्षक किंवा सहायक पोलिस आयुक्त (गट अ), सहायक राज्य कर आयुक्त, गट विकास अधिकारी किंवा सहायक संचालक, महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा, उद्योग उपसंचालक (तांत्रिक) या पदांचा समावेश आहे.


ह्याचा प्रसार करा
Exit mobile version