आपली बारामती न्युज - बारामती व परिसरातील बातम्या देणार हक्काचे व्यासपीठ !
महानगरेमहाराष्ट्रमुंबईराजकारण

Breaking News : नारायण राणे विरूध्द शिवसेना संघर्ष पेटला; राणे यांच्यावर विविध ठिकाणी गुन्हे दाखल

महानगरे
ह्याचा प्रसार करा

मुंबई : प्रतिनिधी

मुख्यमंत्र्यांवरील टीकेनंतर महाड, पुणे नाशिकमध्ये केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. राणेंचं विधान गंभीर, अटक करून कोर्टासमोर हजर करा, असा आदेश नाशिक पोलिसांनी दिले आहेत.

रायगड जनआशीर्वाद यात्रेत मुख्यमंत्र्यांच्या कानशीलात लगावण्याच्या वादग्रस्त वक्तव्यानं युवासेना आक्रमक, युवासैनिकांना आज जुहूत जमण्याचे आदेश देण्यात आले आहेत.नारायण राणे आणि शिवसेना संघर्ष वाढणार आहे. नारायण राणेंच्या वादग्रस्त वक्तव्यानं शिवसेना आक्रमक झाली आहे. मुख्यमंत्र्यांच्या कानशिलात लगावण्याची नारायण राणेंची भाषा चांगलीच भोवली आहे.

महाड, नाशिक, पुणेमध्ये नारायण राणेंच्या विरोधात गुन्हा दाखल कऱण्यात आले आहेत. राणेंचं विधान गंभीर, अटक करून कोर्टासमोर हजर करण्याचे नाशिक पोलिसांचे आदेश देण्यात आले आहेत. राणेंच्या जुहू बंगल्याबाहेर पोलिसांचा ताफा तसेच समर्थकांनी देखील हजेरी लावली आहे.

नारायण राणेंविरोधात पुण्यातही गुन्हा दाखल

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या विरोधात शिवसेना आक्रमक झाल्याचे पहायला मिळत आहे. नाशिकनंतर पुण्यातही राणे यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. पुण्यातील रोहित कदम या शिवसैनिकाच्या तक्रारीनंतर कलम 153 आणि 505 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


ह्याचा प्रसार करा
महानगरे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Contact Us