Site icon Aapli Baramati News

Breaking News : कोरेगाव भीमा प्रकरणी शरद पवार यांना आयोगाकडून समन्स; साक्षीसाठी उपस्थित राहण्याचे दिले आदेश

ह्याचा प्रसार करा

पुणे : प्रतिनिधी

कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणी  चौकशीसाठी नेमण्यात आलेल्या आयोगाकडून राष्ट्रवादीचे अध्यक्ष ज्येष्ठ नेते शरद पवार यांना समन्स बजावण्यात आले आहे. आयोगासमोर शरद पवार यांची साक्ष नोंदवली जाणार आहे. चौकशी आयोगाने शरद पवार यांना २३ फेब्रुवारी रोजी साक्ष नोंदवण्यासाठी उपस्थित राहण्याची सूचना केली आहे. कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणी शरद पवार यांनी एल्गार परिषदेची चौकशी करण्याची मागणी केली होती.

शरद पवार यांच्या सोबत तत्कालिन पोलिस अधीक्षक सुवेझ हक, अतिरिक्त पोलिस आयुक्त रवींद्र सेनगावकर, अतिरिक्त पोलिस अधीक्षक संदीप पखाले यांनाही चौकशीसाठी समन्स बजावण्यात आले आहे. शरद पवार यांनी कोरेगाव भीमा येथील हिंसाचार संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटे यांच्या चिथावणीखोर विधनामुळे झाला आहे, असे विधान केले होते. त्यामुळे कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणी एल्गार परिषदेची चौकशी केली जावी, अशी मागणी देखील शरद पवार यांनी केली होती. त्यामुळे शरद पवार यांना साक्ष नोंदवण्यासाठी समन्स बजावण्यात आली आहे.

यापूर्वी शरद पवार यांना आयोगाकडून साक्ष नोंदवण्यासाठी समन्स आले होते. मात्र काही कारणांमुळे ते साक्ष नोंदविण्यासाठी आयोगासमोर शकले नव्हते. आता पुन्हा त्यांना साक्ष नोंदवण्यासाठी हजर राहण्यास सांगितले आहे. २१ फेब्रुवारी ते २५ फेब्रुवारी आयोगाचे कामकाज पुण्याला न होता मुंबईला होणार आहे. त्यामुळे शरद पवारांना साक्ष नोंदवण्यासाठी मुंबईला हजर राहावे लागणार आहे.


ह्याचा प्रसार करा
Exit mobile version