पुणे : प्रतिनिधी
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुणे शहरात कुठलेही नवे निर्बंध लावणार नाही. मात्र गणेशोत्सवाच्या पहिल्या दिवशी अंदाज घेऊन जर गर्दी वाढत असल्याचे दिसल्यास कठोर निर्बंध लागू करावे लागतील, असा इशारा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला आहे.
पुण्यात कोरोना आढावा बैठकीनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी गणेशोत्सव काळात वेगळे निर्बंध लागू करणार नसल्याचे स्पष्ट केले.
राज्यात ग्रामीण भागात कोरोना संपला अशाच भावनेतून लोक वागत आहेत. कोरोनाला गांभीर्याने घेवून अधिकची काळजी घेणे आवश्यक असल्याचे ना. अजित पवार यांनी यावेळी सांगितले.
लसीकरणात महाराष्ट्र अग्रेसर आहे. पण अजून अनेक नागरिकांचे लसीकरण झाले नाही. राज्याकडून जास्तीत जास्त लसीकरण वाढवण्यावर भर दिला जात असल्याचेही त्यांनी नमूद केले.