Site icon Aapli Baramati News

Breaking : केंद्र सरकारविरोधातील राष्ट्रीय स्तरावरील बैठकीला उद्धव ठाकरे उपस्थित राहणार..?

ह्याचा प्रसार करा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था

यंदाच्या पावसाळी अधिवेशनात विरोधी पक्षांनी मोदी सरकारविरोधात आक्रमक पवित्रा घेतल्याचे पाहायला मिळाले. त्यानंतर आता कॉंग्रेसनेही भाजप विरोधी पक्षांना एकत्र घेत रणनीती आखली आहे. भाजपला घेरण्यासाठी कॉंग्रेससह समविचारी व घटकपक्षांचे नेते, कॉंग्रेसप्रणित राज्य सरकारचे मुख्यमंत्री यांची एक बैठक कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी घेणार आहेत. या बैठकीला ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यासह मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हेही उपस्थित राहणार असल्याची माहिती समोर येत आहे. 

सत्ताधारी मोदी सरकार विरोधात प्रथमच संसदेच्या पावसाळी अधिवेशनात विरोधक एकत्र येत आक्रमक पवित्रा पहायला मिळाला. संसदेत विरोधी पक्षांनी एकत्र आल्यावर आता ही एकजुट कायम राखत भाजपला घेरण्यासाठी काँग्रेस पक्षाने रणनिती आखली आहे. काँग्रेसची विचारधारा आणि यूपीएतील घटक पक्ष तसेच समविचारी पक्षांच्या मुख्यमंत्र्यांसोबत काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी बैठक घेणार आहेत. 

या बैठकीत काँग्रेस प्रणित राज्य सरकारचे मुख्यमंत्री उपस्थित राहणार आहेत. तसेच राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार सुद्धा उपस्थित राहणार असल्याची माहिती समोर येत आहे. येत्या २० ऑगस्ट रोजी ही बैठक आयोजित करण्यात आली आहे.

या बैठकीत समविचारी विरोधी पक्षांचे नेते, भाजप विरोधी पक्षांचे नेते, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार सुद्धा उपस्थित राहणार आहेत. तसेच काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते सुद्धा बैठकीत उपस्थित असणार आहेत.


ह्याचा प्रसार करा
Exit mobile version