मुंबई : प्रतिनिधी
भारतीय जनता पक्ष विरोधकांचा आवाज दडपण्यासाठी केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर करत असून हे उघड झाले आहे. ईडी भाजपची शाखा असल्यासारखे काम करत असून भाजपकडून कोल्हापूर मतदारांना ईडीची धमकी दिली जाते, असा गंभीर आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपवर केला आहे.
कोल्हापूरच्या पोटनिवडणुकीत काँग्रेस पक्षाचा विजय निश्चित झाला आहे. भाजपचा कोल्हापूरमध्ये पराभव होत असल्याचे दिसताच भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पेटीएमच्या माध्यमातुन घेतलेल्या पैशांची चौकशी होणार असल्याची धमकी मतदारांना दिली आहे.
पेटीएमद्वारे वाटलेल्या हजार-पाचशे रुपये यांची चौकशी ईडी करणार का ? आणि ती चौकशी भाजपच्या इशाऱ्यावरून होणार का ? असे प्रश्न नाना पटोले यांनी यावेळी उपस्थित केले आहेत. भाजपवर महाविकास आघाडी सरकार केंद्रीय तपास यंत्रणांवरून जोरदार निशाणा साधत आहे. त्यातच आता नाना पटोले यांनीही जोरदार टीका केली आहे.