मुंबई : प्रतिनिधी
गोरेगाव पत्राचाळ घोटाळा प्रकरणी ईडीच्या अटकेत असलेले शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांना न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. संजय राऊत यांना न्यायालयाकडून जामीन मंजूर करण्यात आला आहे. तब्बल १०० दिवसानंतर न्यायालयाने संजय राऊत यांचा मंजूर केला आहे.
गोरेगाव पात्राचाळ घोटाळा प्रकरणी ईडी अर्थात सक्त वसुली संचालनालयाकडून संजय राऊत यांना ऑगस्टमध्ये अटक केली होती. त्यानंतर न्यायालयाने त्यांचा मुक्काम आर्थर रोड तुरुंगात हलवला होता. संजय राऊत यांच्याकडून पीएमएलए न्यायालयामध्ये जामिनासाठी अर्ज करण्यात आला होता. अखेर न्यायालयाने संजय राऊत यांना जामीन मंजूर केला.
मागील सुनावणीमध्ये न्यायालयाकडून संजय राऊत यांच्या जामीन अर्जावरील निकाल राखीव ठेवण्यात आला होता. तसेच न्यायालयाने ९ नोव्हेंबरपर्यंत संजय राऊत यांचा तुरुंगातील मुक्काम वाढवला होता. आज पुन्हा संजय राऊत यांना न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने संजय राऊत यांच्या जामीन अर्जावर राखीव ठेवलेला निकाल दिला. अखेर न्यायालयाने संजय राऊत यांचा जामीन मंजूर केला आहे.