Site icon Aapli Baramati News

मोठी बातमी : लवकरच एक हजार तलाठ्यांची भरती करणार; बाळासाहेब थोरात यांची विधानसभेत घोषणा

ह्याचा प्रसार करा

मुंबई : प्रतिनिधी

गावपातळीवरील महसूल विभागाचे काम सुरळीत पार पडावे त्यासाठी राज्याच्या महसूल विभागाने एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. काल महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी विधानसभेत लवकरच एक हजार तलाठ्यांची पदे भरली जाणार असल्याची घोषणा केली आहे.

मंत्रिमंडळाने ३ हजार १६५ जागांवर पदांच्या भरतीसाठी हिरवा कंदील दाखवला आहे. त्यानुसार पहिल्या टप्प्यात एक हजार तलाठ्यांनी भरती करण्यात येणार आहे, अशी माहिती त्यांनी दिली. सध्या हवेली तालुक्यातील १६० गावात एकुण ४६ तलाठी कार्यरत आहेत. आता शासनाने ३ हजार १६५ पदांची भरती करण्याला मंजुरी दिली आहे. याबाबत संबंधित भागांतील तलाठ्यांनी रिक्त पदे लगेच भरण्यात येणार आहेत असे थोरात यांनी विधानसभेत बोलत असताना सांगितले.

अगोदरच शहराची लोकसंख्या विचारात घेऊन आणि शहरीकरणामुळे पिंपरी चिंचवड येथे अपर तहसीलदार कार्यालय स्थापन करण्यास परवानगी दिली असून लोणी काळभोर येथे अपर तहसीलदार कार्यालय स्थापनेसाठी प्रस्तावावर निर्णय घेतला जाणार आहे. याबाबत आमदार अशोक पवार आणि भीमराव तापकिर यांनी विधानसभेत प्रश्न उपस्थित केला होता.

 


ह्याचा प्रसार करा
Exit mobile version