Site icon Aapli Baramati News

मोठी बातमी : गुणरत्न सदावर्ते यांना सातारा पोलिसांनी घेतलं ताब्यात; मुंबईहून पोलिस साताऱ्याकडे रवाना..!

ह्याचा प्रसार करा

मुंबई : प्रतिनिधी

सिल्वर ओक हल्ल्याप्रकरणी न्यायालयीन कोठडीत रवानगी झालेले एसटी कामगारांचे वकील गुणरत्न सदावर्ते यांना आज सातारा पोलिसांनी ताब्यात घेतले. जातीय तेढ निर्माण करणारे तसेच छत्रपती उदयनराजे आणि संभाजीराजे यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी दोन वर्षांपूर्वी सातारा पोलिस ठाण्यात त्यांच्यावर गुन्हा दाखल होता. 

ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या मुंबईतील घरावर एसटी कर्मचाऱ्यांनी हल्ला केल्यानंतर सदावर्ते यांना अटक करण्यात आली. काल त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. त्यानंतर आज त्यांना सातारा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. 

दोन वर्षांपूर्वी सदावर्ते यांनी एका खाजगी न्यूज चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत छत्रपती उदयनराजे भोसले आणि कोल्हापूरचे संभाजीराजे यांच्याविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. या प्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यामध्ये राजेंद्र निकम यांनी तक्रार दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ऑक्टोबर २०२० मध्ये दाखल गुन्ह्याच्या चौकशीसाठी सदावर्ते यांना बोलावण्यात आले होते. 

अनेकदा बोलावूनही ते गैरहजर राहिल्याने सातारा शहर पोलिसांनी या प्रकरणात ताबा मिळण्यासाठी गिरगाव न्यायालयात अर्ज केला होता. अखेर पोलिसांची विनंती मान्य करत न्यायालयाने सदावर्ते यांचा ताबा सातारा पोलिसांकडे दिल्यानंतर आज सदावर्तेंना सातारा पोलिसांनी ताब्यात घेत साताऱ्याकडे रवाना झाले आहेत.


ह्याचा प्रसार करा
Exit mobile version