आपली बारामती न्युज - बारामती व परिसरातील बातम्या देणार हक्काचे व्यासपीठ !
महाराष्ट्र

मोठी बातमी : पुणे-सातारा महामार्गावर भीषण अपघात; कंटेनर-बसच्या धडकेत चौघांचा मृत्यू; २३ प्रवासी जखमी

महाराष्ट्र
ह्याचा प्रसार करा

सातारा : प्रतिनिधी  

पुणे-सातारा महामार्गावर एक भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. कंटेनर आणि बसच्या विचित्र अपघातात चौघांचा मृत्यू झाला आहे. तर २३ प्रवासी जखमी झाले आहेत. सातारा जिल्ह्यातील वरवे गावाच्या हद्दीत आज दुपारच्या सुमारास हा अपघात झाला. दरम्यान, या अपघातानंतर काही काल महामार्गावर वाहतूक खोळंबली होती.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, सातारा महामार्गावर वरवे गावच्या हद्दीत आज दुपारी विचित्री अपघात झाला. त्यामध्ये चार वाहने एकमेकांना धडकली असून त्यामध्ये चार जणांना जीव गमवावा लागला आहे. तर २३ प्रवासी जखमी झाले आहेत. यामध्ये दोन कंटेनर आणि दोन बसचा समावेश आहे. या विचित्र अपघातात खासगी बस पलटी झाल्यामुळे त्यामधील चौघे जागीच ठार झाले.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार ही वाहने पुण्याहून साताऱ्याकडे निघाली होती. त्यावेळी हा विचित्र अपघात झाला आहे. सुरुवातीला बसने कंटेनरला धडक दिली.  तसेच एका कारने देखील कंटेनरला पाठीमागून धडक दिली. यामध्ये कारचे नुकसान झाले पण कारमधील प्रवासी सुखरुप आहेत. दुसरीकडे बसमधील जखमींमध्ये चौघांची प्रकृती गंभीर असल्याचे समजते.

अपघातानंतर स्थानिकांनी तात्काळ घटनास्थळी जात मदतकार्य सुरू केले. जवळच्या रुग्णालयात जखमींना दाखल करण्यात आले आहे. तर अपघातात मृत पावलेल्या प्रवाशांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. या घटनेनंतर महामार्गावरील वाहतूक काही काळ खोळंबली होती.


ह्याचा प्रसार करा
महाराष्ट्र
Back to top button
Contact Us