Site icon Aapli Baramati News

Big News : महाराष्ट्र सदन घोटाळ्यातून छगन भुजबळ यांची निर्दोष मुक्तता

ह्याचा प्रसार करा

मुंबई : प्रतिनिधी

राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांची महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणी निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. मुंबई सत्र न्यायालयाने अंजली दमानिया यांनी दाखल केलेली याचिका निकाली काढली आहे.

महाराष्ट्र सदन कथित घोटाळ्याप्रकरणी अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्यासह पुतण्या समीर भुजबळ यांच्यावर आरोप करण्यात आले होते. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या(एसीबी) न्यायालयाकडे दोषमुक्त करण्यासाठी भुजबळांनी अर्ज दाखल केला होता.

छगन भुजबळ यांच्यासोबत त्यांचा पुतण्या समीर भुजबळ यांनीही हा अर्ज दाखल केला होता.आपल्यावर करण्यात आलले आरोप हे निराधार आहेत. त्यामुळे न्यायालयाने आपल्याला दोषमुक्त करावे, असे भुजबळ म्हटले होते. त्यानंतर गुरुवारी न्यायालयाने भुजबळ यांची निर्दोष मुक्तता केली आहे.

आरोपींविरोधात कुठलेही सबळ पुरावे एसीबीकडे उपलब्ध नाहीत, असे न्यायालयाने म्हटले आहे.
महाराष्ट्र सदन कथित घोटाळा प्रकरणी छगन भुजबळ आणि त्यांच्या कुटुंबियांविरोधात पुरावे आहेत, असा दावा करत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने भुजबळ यांच्या प्रकरणातून दोषमुक्त करण्याच्या मागणीला विरोध केला होता.


ह्याचा प्रसार करा
Exit mobile version