पुणे : प्रतिनिधी
मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी मोठ्या प्रमाणात आंदोलने झाली. या आंदोलनात काहीजणांना आपला जीव गमवावा लागला. या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी सरकारने या आंदोलनातील मृतांच्या वारसांना प्रत्येकी १० लाख रुपये मदत देण्याचा निर्णय घेतला आहे. राष्ट्रवादीचे युवा नेते पार्थ पवार यांनी या निर्णयाचे स्वागत करत संबंधित कुटुंबीयांना या भरपाईमुळे दिलासा मिळेल, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
काही वर्षांपूर्वी महाराष्ट्रात मराठा समाजाने आरक्षणाच्या मागणीसाठी आक्रमक पवित्रा घेत राज्यभर आंदोलने केली. या आंदोलनादरम्यान, काहीजणांना आपला जीव गमवावा लागला. तब्बल ३४ आंदोलकांचा यात मृत्यू झाला. या सर्व आंदोलकांच्या वारसांना प्रत्येकी १० लाख रुपयांची मदत देण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकारने घेतला आहे. या निर्णयाचे युवा नेते पार्थ पवार यांनी स्वागत केले आहे.
महाविकास आघाडी सरकारने मराठा समाजाच्या आरक्षणाच्या लढ्यातील मृतांच्या वारसांना १० लाख रुपये मदत देण्याचा निर्णय घेतला आहे. या आंदोलनात मृत पावलेल्या आंदोलकांची जागा कुणीही घेऊ शकत नाही, मात्र राज्य सरकारकडून झालेली ही मदत त्यांच्या कुटुंबीयांना दिलासा देणारी ठरेल, असे पार्थ पवार यांनी म्हटले आहे. त्याचवेळी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांचेही आभार मानले आहेत.
यासंदर्भात ट्विट करत पार्थ पवार यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. मराठा आरक्षण आंदोलनात मृत्यू झालेल्या आंदोलकांच्या वारसांना प्रत्येकी १० लाख ₹ देण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकारने घेतलाय. आंदोलनात जीव गमावलेल्यांची ३४ जणांची जागा कोणीही घेऊ शकत नसले तरी,भरपाईमुळे कुटुंबांना दिलासा मिळेल अशी आशा असल्याचे त्यांनी या ट्विटमध्ये नमूद केले आहे.