Site icon Aapli Baramati News

Big News : मनोहरमामाला करमाळा न्यायालयाकडून सात दिवसांची पोलिस कोठडी

ह्याचा प्रसार करा

करमाळा : प्रतिनिधी

बारामती पोलिसांच्या ताब्यातून करमाळा पोलिसांकडे वर्ग करण्यात आलेल्या मनोहरमामा उर्फ मनोहर भोसले याला सात दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश करमाळा येथील न्यायालयाने दिले आहेत. मालिकेत काम देण्याचे आमिष दाखवून बलात्कार आणि फसवणूक केल्याच्या प्रकरणात मनोहरमामावर करमाळा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

रविवारी बारामतीतील जिल्हा व सत्र न्यायालयाने मनोहर भोसले याला न्यायालयीन कोठडी सुनावली. त्यानंतर करमाळा पोलिसांनी न्यायालयात अर्ज दाखल करत मनोहर भोसले याला बलात्कार आणि फसवणूकप्रकरणी वर्ग करण्याची मागणी केली. त्यानुसार न्यायालयाने मंजूरी दिल्यानंतर सर्व प्रक्रिया पार पाडत करमाळ्याचे पोलिस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांनी मनोहरमामाला ताब्यात घेतले.

आज दुपारी करमाळा येथील न्यायालयात मनोहरमामाला हजर करण्यात आले. पोलिस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांनी या प्रकरणातील विविध बाबींचा तपास करण्यासाठी १० दिवसांची पोलिस कोठडी द्यावी अशी मागणी केली. सरकारी वकिलांनीही ही मागणी लावून धरत पिडीतेवरील अत्याचाराबाबत योग्य तपास होण्यासाठी पोलिस कोठडी गरजेची असल्याचे सांगितले. त्यानुसार न्यायालयाने सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.


ह्याचा प्रसार करा
Exit mobile version