Site icon Aapli Baramati News

Big Crime News : पुण्यातही ‘बुली बाई’ प्रकरण; ब्राझील, पाकिस्तानसह अन्य देशात व्हायरल केले फोटो आणि व्हिडिओ

ह्याचा प्रसार करा

पुणे : प्रतिनिधी

सध्या देशात बुली बाई प्रकरण चांगलेच गाजत आहे. त्यातून काही जणांना अटक देखील करण्यात आली आहे. मात्र आता बुली बाईसारखाच प्रकार पुण्यात घडला आहे. पुण्यातील खडकी परिसरात हा प्रकार घडला असून या प्रकरणी एका पंचवीस वर्षीय युवकाला अटक करण्यात आली आहे. 

पोलिसांनी अटक केलेल्या या युवकाने पुणे शहरातील विविध वस्त्यांमध्ये राहणाऱ्या महिला आणि अल्पवयीन मुलींचे फोटो आणि व्हिडिओ मोबाईलवर काढले. त्यांनतर त्याने फोटो आणि व्हिडिओ अश्लील स्वरुपात बनवले. तो इतक्यावरच थांबला नाही, त्याने हे सर्व अश्लील व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल केले.

या प्रकरणात त्याच्यावर खडकी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  त्याला १५ जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. अधिक तपासात २०१९ पासून तो या प्रकारचे अश्लील व्हिडिओ आणि फोटो बनत असल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी आरोपीचा मोबाईल जप्त केला असून इतर मोबाईलवर देखील त्याने असे व्हिडिओ तयार केले आहेत.

त्याचबरोबर त्याने ब्राझील, पाकिस्तान आणि इतर देशात व्हाट्सअप ग्रुपवर असे फोटो आणि व्हिडिओ वायरल केले आहेत. या संपुर्ण घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.


ह्याचा प्रसार करा
Exit mobile version