
पुणे : प्रतिनिधी
गेल्या अनेक दिवसांपासून विद्यार्थ्यांना प्रतिक्षा असलेली महत्वाची बातमी समोर आली आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या बारावी परिक्षांचा निकाल उद्या गुरुवार दि. २५ मे रोजी दुपारी २ वाजता जाहिर केला जाणार आहे.
मार्च-एप्रिलमध्ये बारावीच्या परिक्षा घेण्यात आल्या होत्या. या परिक्षांचा निकाल कधी जाहीर होणार याकडे विद्यार्थी व पालकांचे लक्ष लागले होते. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने या निकालाची तारीख निश्चित केली असून उद्याच बारावीचे निकाल जाहीर होणार आहेत.
उद्या दुपारी २ वाजता ऑनलाईन पद्धतीने हे निकाल जाहीर होणार आहेत. ऑनलाईन निकालानंतर गुणपडताळणी, उत्तरपत्रिकांच्या छायांकित प्रती, पुनर्मूल्यांकन ऑनलाईन अर्ज स्विकारण्याची प्रक्रिया सुरु केली जाणार आहे. याबाबत सविस्तर माहिती राज्य मंडळाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
इथे पहा निकाल
www.mahresult.nic.in
https://hsc.mahresults.org.in
http://hscresult.mkcl.org