Site icon Aapli Baramati News

BIG BREAKING : महाराष्ट्रात कोरोनाचा कहर वाढतोय.. या नेत्यांना झाली कोरोनाची बाधा

ह्याचा प्रसार करा
FacebookTwitterLinkedinWhatsappInstagramEmailTelegram

मुंबई : प्रतिनिधी

महाराष्ट्रात कोरोनाचा कहर वाढताना दिसत आहे. मंगळवारी ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांच्या पाठोपाठ शिंदे सरकारमधील मंत्री शंभुराज देसाई यांनाही कोरोनाची बाधा झाली आहे. याबाबत त्यांनी समाजमाध्यमातून माहिती दिली असून संपर्कातील व्यक्तींनी काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.

आज सकाळी माजी मंत्री छगन भुजबळ यांना सर्दी, तापाचा त्रास जाणवला. त्यांची तपासणी केली असता त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनाही कोरोनाची बाधा झाली आहे. याबद्दल त्यांनी सोशल मिडीयावरुन पोस्ट करत ही माहिती दिली आहे. मागील तीन दिवसात संपर्कात आलेल्या व्यक्तींनी दक्षता घेण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे.

माझी कोविड चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. मी गृह विलगीकरणात डॉक्टरांकडून उपचार घेत आहे. माझी प्रकृती ठीक असून काळजी करण्याचे कारण नाही. गेल्या तीन-चार दिवसांमध्ये माझ्या प्रत्यक्ष संपर्कात आलेल्यांनी त्यांना काही लक्षणे आढळल्यास त्वरित कोविड चाचणी करून घ्यावी, ही विनंती आहे. कोविडच्या पार्श्वभूमीवर सर्वांनी योग्य ती काळजी घ्यावी, असे आवाहन यानिमित्ताने करतो, असे शंभूराज देसाई यांनी आपल्या पोस्टमध्ये नमूद केले आहे.


ह्याचा प्रसार करा
FacebookTwitterLinkedinWhatsappInstagramEmailTelegram
Exit mobile version