Site icon Aapli Baramati News

Big Breaking : मंत्रीपद बचाना होगा; तो दस करोड कौनसी बडी बात है..! धनंजय मुंडे यांना ब्लॅकमेल करणाऱ्या रेणु शर्माला अटक

ह्याचा प्रसार करा

मुंबई : प्रतिनिधी  

सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांना ब्लॅकमेल करून पाच कोटी रुपये रोख आणि पाच कोटींचे दुकान मागणाऱ्या रेणु शर्मा हिला मुंबई क्राईम ब्रांच आणि इंदौर पोलिसांनी संयुक्तपणे कारवाई करत अटक केली आहे. मुंबईच्या मलबार हिल पोलीस ठाण्यात रेणु शर्माविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.

‘मागील वर्षी सहजच एक कागद पोलिसांत दिला तर तुमचं मंत्री पद धोक्यात आलं होतं, आता पुन्हा माझ्यावर बलात्कार झाला असल्याची तक्रार करून सोशल मीडियावरून बदनामी करून तुमचं मंत्रीपद घालवीन, असं होऊ द्यायचं नसेल तर मला ५ कोटी रक्कम आणि ५ कोटींचे दुकान घेऊन द्या’, अशी धमकी देत रेणु शर्मा हिने सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांना ब्लॅकमेल केलं होतं. या प्रकरणी धनंजय मुंडे यांनी मुंबई पोलिसांकडे या महिलेविरुद्ध खंडणी मागितल्याची तसेच ब्लॅकमेल करत असल्याची पुराव्यांसह तक्रार दिली.

मागील वर्षी रेणु शर्मा हिनं धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचा आरोप केला होता. त्यानंतर तिने आपली तक्रार मागे घेत परदेशातील नंबर वापरुन पैशांसाठी तगादा लावला होता. अगर तुम्हे मंत्री पद बचाना है तो दस करोड कौनसी बडी बात है असे म्हणत या महिलेने धनंजय मुंडे यांना ब्लॅकमेल केलं होतं. त्याबाबत पुराव्यासह धनंजय मुंडे यांनी तक्रार दिली होती.

दरम्यान, रेणू शर्मा ही मूळ इंदोर मध्य प्रदेशातील असून ती करुणा शर्माची बहीण आहे. धनंजय मुंडे यांच्या तक्रारीनंतर तिला अटक करण्यात आली आहे. रेणु शर्मा हिच्यावर अनेकांना ब्लॅकमेल केल्याच्या तक्रारी दाखल आहेत.


ह्याचा प्रसार करा
Exit mobile version