Site icon Aapli Baramati News

Big Breaking : विधानपरिषदेसाठी राष्ट्रवादीकडून रामराजे निंबाळकर आणि एकनाथ खडसे यांना उमेदवारी

ह्याचा प्रसार करा

मुंबई : प्रतिनिधी

येत्या काही दिवसात होत असलेल्या विधानपरिषद निवडणुकीसाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून विद्यमान सभापती रामराजे नाईक निंबाळकर आणि ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांना उमेदवारी जाहिर केली आहे. या दोघांचाही उमेदवारी अर्ज आज दाखल केला जाणार आहे.

राज्यातील विधानपरिषदेच्या १० जागांसाठी निवडणुक होत आहे. या निवडणुकीसाठी राष्ट्रवादीकडून रामराजे नाईक निंबाळकर आणि एकनाथ खडसे यांची उमेदवारी निश्चित करण्यात आली आहे. आज या दोघांचे उमेदवारी अर्ज दाखल केले जाणार आहेत.

एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर त्यांचे राजकीय पुनर्वसन होणार का याबद्दल चर्चा सुरु होती. आता राष्ट्रवादीकडून विधानपरिषदेची उमेदवारी देवून खडसे यांना पक्षीय पाठबळ देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

दरम्यान, उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे विधानपरिषदेची निवडणुक बिनविरोध होणार की राज्यसभेप्रमाणे निवडणुक लागणार याकडे लक्ष लागले आहे.


ह्याचा प्रसार करा
Exit mobile version