मुंबई : प्रतिनिधी
राज्याचे सामाजिक न्यायमंत्री तथा बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांना हृदयविकाराचा सौम्य झटका आला आहे. त्यांना मुंबईतील ब्रीच कॅन्डी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
मंगळवारी दिवसभर धनंजय मुंडे यांना त्रास जाणवत होता. त्यामूळे त्यांना ब्रीच कॅन्डी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्या ठिकाणी त्यांच्यावर उपचार सुरु करण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर आहे.
दरम्यान, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या देखरेखीखाली मुंडे यांच्यावर उपचार सुरु असून त्यांना काही दिवस विश्रांतीचा सल्ला देण्यात आल्याचे समजते.