Site icon Aapli Baramati News

BIG BREAKING : अखेर मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण मागे; माजी न्यायमूर्तींसह मंत्र्यांच्या शिष्टमंडळाच्या चर्चेनंतर घेतला निर्णय..!

ह्याचा प्रसार करा

जालना : प्रतिनिधी

मराठा समाजाला आरक्षण द्यावं या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी सुरु केलेलं अन्नत्याग आंदोलन आज मागे घेतलं. दोन माजी न्यायमूर्ती आणि मंत्र्यांच्या शिष्टमंडळाने केलेल्या चर्चेनंतर जरांगे पाटील यांनी आपले उपोषण मागे घेतले आहे.

येत्या हिवाळी अधिवेशनात मराठा आरक्षणावर सर्वपक्षीय चर्चा घडवून पुढील प्रक्रिया केली जाईल असं आश्वासन शिष्टमंडळाकडून देण्यात आलं. आता सरसकट आरक्षण द्यायला सरकार तयार झालं आहे. त्यामुळे त्यांना वेळ दिला पाहिजे. मात्र यानंतर पुन्हा वेळ मिळणार नाही ही शेवटचीच वेळ आहे असं मनोज जरांगे पाटील यांनी यावेळी सांगितलं.

मराठा आरक्षण आणि अन्य मागण्यांबाबत २ जानेवारीपर्यंत सर्व प्रक्रिया पूर्ण कराव्यात असंही जरांगे पाटील यांनी सांगितलं. सुरुवातीला २४ डिसेंबरपर्यंत सरकारने सर्व प्रक्रिया पूर्ण कराव्यात अशी मागणी केली होती. परंतु शिष्टमंडळाने २ जानेवारीपर्यंत मुदत मागितल्यानंतर जरांगे पाटील यांनी उपस्थितांशी चर्चा करत सरकारला २ महिन्यांचा वेळ देत उपोषण मागे घेतले.

सविस्तर बातमी थोड्याच वेळात..


ह्याचा प्रसार करा
Exit mobile version