Site icon Aapli Baramati News

BIG BREAKING : मनोज जरांगे पाटील यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी दूरध्वनीवरुन चर्चा; सरसकट आरक्षणाच्या मागणीवर जरांगे पाटील ठाम..!

ह्याचा प्रसार करा

जालना : प्रतिनिधी

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी सुरु केलेल्या आंदोलनाचा आज सातवा दिवस आहे. आज सकाळी मनोज जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी दूरध्वनीवरुन चर्चा केली. जवळपास २० मिनिटं या दोघांमध्ये चर्चा झाली असून सरसकट आरक्षण द्यावं या मागणीवर जरांगे पाटील ठाम असल्याची माहिती मिळत आहेत.

मराठा आरक्षणासाठीचं आंदोलन दिवसेंदिवस तीव्र होत आहे. त्यातच या आंदोलनाला हिंसक वळण लागलं आहे. बीड जिल्ह्यात जाळपोळीच्या घटना घडल्या आहेत. अशातच राज्य शासनाकडून आरक्षणाच्या हालचाली वाढल्या आहेत. काल मराठा आरक्षण मंत्री उपसमितीची बैठकही पार पडली. त्यानंतर आज सकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनोज जरांगे पाटील यांच्याशी दूरध्वनीवरुन चर्चा केली.

या दोघांमध्ये जवळपास २० मिनिटं चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे. या चर्चेदरम्यान, जरांगे पाटील यांनी सरसकट आरक्षण द्यावं या मागणीवर ठाम असल्याचं सांगितलं. सरकार आरक्षण देण्यासाठी कटीबद्ध असून योग्य निर्णय घेतला जाईल असं मुख्यमंत्र्यांनी सांगितल्याचंही समजतं. विशेष म्हणजे जरांगे पाटील यांना तब्येतीची काळजी घेण्याचा सल्लाही मुख्यमंत्र्यांनी दिला आहे.

दरम्यान, जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचा आज सातवा दिवस आहे. आज दुपारी मंत्रीमंडळ बैठक होत असून त्यात आरक्षणाच्या विषयावर तोडगा निघण्याची शक्यता वर्तवली जात आहे.


ह्याचा प्रसार करा
Exit mobile version