Site icon Aapli Baramati News

BIG BREAKING : ठाकरे गटाची गळती थांबेना; निलम गोऱ्हे यांचा शिंदे सेनेत प्रवेश निश्चित, विधानपरिषदेत ठाकरे गटाचं संख्याबळ घटलं..!

ह्याचा प्रसार करा

मुंबई : प्रतिनिधी

एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर उद्धव ठाकरे गटाला लागलेली गळती थांबत नसल्याचे चित्र आहे. उद्धव ठाकरे यांच्या अत्यंत निकटवर्ती समजल्या जाणाऱ्या विधान परिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हे यांनी ठाकरे गटाला सोडचिठ्ठी देत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. आजच त्या शिंदे सेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. दरम्यान, निलम गोऱ्हे यांच्या प्रवेशामुळे ठाकरे गटाचे विधानपरिषदेतील संख्याबळ कमी होणार असून अंबादास दानवे यांचं विरोधी पक्षनेतेपद अडचणीत येणार आहे.

मागील वर्षभरात राज्यातील राजकारणात अनेक घडामोडी घडल्या आहेत. त्यामध्ये एकनाथ शिंदे यांनी बंड करत थेट मुख्यमंत्रीपद मिळवले. त्यानंतर उद्धव ठाकरे यांना सातत्याने धक्के बसत असून अनेक जवळच्या सहकाऱ्यांनी त्यांना ‘जय महाराष्ट्र’ केला. आता ठाकरे यांच्या निकटवर्ती समजल्या जाणाऱ्या निलम गोऱ्हे यांनीही उद्धव ठाकरे यांची साथ सोडत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत जाण्याचा निर्णय घेतला आहे. निलम गोऱ्हे यांचा प्रवेश हा उद्धव ठाकरे यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे.

दुसरीकडे, एकनाथ शिंदे यांनी ४० आमदारांना सोबत घेतले. त्यानंतर अनेकांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडली. त्याचवेळी विधानपरिषदेच्याही अनेक आमदारांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडली. आता निलम गोऱ्हे यांनीही शिंदे गटात जाण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे विधानपरिषदेतील ठाकरे गटाचं संख्याबळ घटलं आहे. परिणामी अंबादास दानवे यांचं विरोधी पक्षनेतेपद अडचणीत आलं आहे. त्यामुळे येणाऱ्या दिवसांत राज्याच्या राजकारणात आणखी घडामोडी घडण्याची शक्यता आहे.


ह्याचा प्रसार करा
Exit mobile version