Site icon Aapli Baramati News

BIG BREAKING : किमान पुढच्या अधिवेशनापूर्वी तरी आश्वासन दिलेल्या बैठका लावा : अजितदादा सरकारवर संतापले…!

ह्याचा प्रसार करा

मुंबई : प्रतिनिधी

विविध आयुधांच्या माध्यमातून सभागृहात सदस्य विविध प्रश्न तळमळीने  मांडत असतात. यावेळी सरकारच्या वतीने त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी बैठक लावण्याचे आश्वासन दिले जाते. मात्र अनेक मंत्र्यांकडून सभागृहात आश्वासन दिलेल्या बैठकाच घेतल्या जात नाहीत, ही बाब अत्यंत संतापजनक आहे. सभागृहात आश्वासन दिलेल्या बैठका किमान पुढच्या अधिवेशनाच्या पूर्वी तरी लावण्याची मागणी करत विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सर्व सदस्यांच्या भावना सभागृहात मांडल्या.  

विरोधी पक्षनेते अजित पवार म्हणाले, राज्यातल्या सर्वसामान्यांचे प्रश्न सदस्य सभागृहात विविध संसदीय  आयुधांचा वापर करुन मांडत असतात. हे प्रश्न सोडविण्यासाठी संबंधित मंत्री सभागृहात याविषयी बैठकी घेण्याचे आश्वासन देत असतात. मात्र आश्वासन दिलेल्या अनेक बैठका घेतल्याच जात नाहीत.

या सर्व प्रकारांमुळे सर्वसामान्यांचे प्रश्न सुटत नाहीत, त्यावर कोणताही मार्ग निघत नाही. त्यामुळे सभागृहात सदस्यांना बैठका घेण्याचे दिलेले आश्वासन पाळले जावे,‍ किमान पुढचे अधिवेशन येईपर्यंत तरी बैठकींचे आयोजन केले जावे. अध्यक्षांनी तसे निर्देश सरकारला देण्याची मागणी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सभागृहात केली. 


ह्याचा प्रसार करा
Exit mobile version