आपली बारामती न्युज - बारामती व परिसरातील बातम्या देणार हक्काचे व्यासपीठ !
महाराष्ट्र

BIG BREAKING : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची उचलबांगडी होणार..? राष्ट्रपतींनी उचललं ‘मोठं पाऊल’

महाराष्ट्र
ह्याचा प्रसार करा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी एका जाहीर कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त विधान केलं. त्यानंतर त्यांच्याविरोधात राज्यभरातून संताप व्यक्त होत आहे. खासदार उदयनराजे भोसले यांनी राष्ट्रपती द्रौपदी मूर्मू  यांना पत्र पाठवत भगतसिंह कोश्यारी यांची महाराष्ट्राच्या राज्यपालपदावरून हकालपट्टी करण्याची मागणी केली होती.  आता द्रौपदी मूर्मू यांनी या पत्राची दखल घेत मोठे पाऊल उचलले आहे.

उदयनराजे भोसले यांनी भगतसिंह कोश्यारी यांच्या हकालपट्टीच्या मागणीबाबत पाठवलेल्या पत्राची द्रौपदी मूर्मू यांनी दखल घेतली आहे. त्यांनी पत्र पुढील कार्यवाहीसाठी केंद्रीय गृह विभागाकडे पाठवले आहे. याबाबतची माहिती राष्ट्रपती कार्यालयाकडून उदयनराजे यांना देण्यात आली आहे. त्यामुळे केंद्राकडून भगतसिंह कोश्यारी यांच्यावर कोणती कारवाई होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजीमहाराज यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केल्यानंतर उदयनराजे भोसले यांनी संताप व्यक्त करत २३ नोव्हेंबर रोजी राष्ट्रपतींना कोश्यारी यांची हकालपट्टी करण्यासंदर्भात पत्र पाठवले होते. उदयनराजे यांनी कोश्यारी यांच्या विरोधक आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यांनी रायगडावर ‘निर्धार शिवसन्मानाचा’ मेळावा घेत राज्यपालांवर टीका केली. लवकरच ते मुंबईतील आझाद मैदानावर मेळावा घेणार आहेत.


ह्याचा प्रसार करा
महाराष्ट्र
Back to top button
Contact Us