आपली बारामती न्युज - बारामती व परिसरातील बातम्या देणार हक्काचे व्यासपीठ !
पश्चिम महाराष्ट्रमहानगरेमहाराष्ट्रमुंबईराजकारण

Big Breaking : माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांना कोरोनाची लागण

पश्चिम महाराष्ट्र
ह्याचा प्रसार करा

इंदापूर : प्रतिनिधी
राज्याचे माजी सहकारमंत्री तथा भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांना कोऱ्रोनाची लागण झाली आहे. याबाबत त्यांनी ट्विट करत माहिती दिली असून संपर्कात आलेल्या व्यक्तींनी तपासणी करून घेण्याचे आवाहन केले आहे. दोन दिवसांपूर्वीच हर्षवर्धन पाटील यांच्या कन्या अंकीता यांचा मुंबईत विवाह सोहळा पार पडला. या सोहळ्यात राज्यातील अनेक मान्यवरांनी हजेरी लावली होती.
२८ डिसेंबर रोजी अंकिता पाटील यांचा निहार ठाकरे यांच्याशी मुंबईतील हॉटेल ताजमध्ये विवाह पार पडला. या विवाह सोहळ्याला खासदार सुप्रिया सुळेही हजर होत्या. विवाहाच्या दुसऱ्याच दिवशी सुप्रिया सुळे यांच्यासह त्यांच्या कुटुंबीयांना कोरोनाची बाधा झाली. त्या पाठोपाठ आज हर्षवर्धन पाटील यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. याबद्दल हर्षवर्धन पाटील यांनी ट्विटरवरून माहिती दिली आहे.
विवाह सोहळ्यानंतर हर्षवर्धन पाटील यांनी कोरोनाची चाचणी केली. त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. याबाबत सुरक्षेच्या दृष्टिकोनातून कोरोना चाचणी केली असता ती टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी आपली कोरोना टेस्ट करून घ्यावी व काळजी घ्यावी ही विनंती, असे ट्विट हर्षवर्धन पाटील यांनी केले आहे.
माजी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनाही कोरोनाची लागण झाल्याची माहिती पुढे येत आहे. मागील काही दिवसांत कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला असून राज्यातील अनेक महत्वाच्या नेत्यांना कोरोनाची लागण झाली आहे.


ह्याचा प्रसार करा
पश्चिम महाराष्ट्र
Back to top button
Contact Us