आपली बारामती न्युज - बारामती व परिसरातील बातम्या देणार हक्काचे व्यासपीठ !
महाराष्ट्र

Big Breaking : एकनाथ शिंदेंचं बंड; बंडखोर आमदार वेगळा गट स्थापण्याच्या तयारीत, ५० पर्यंत संख्या पोहोचेल..?

महाराष्ट्र
ह्याचा प्रसार करा

मुंबई : प्रतिनिधी

शिवसेनेतील नेते एकनाथ शिंदे यांच्यासह आमदारांनी बंड पुकारले आहे. या सर्वांना समजावून त्यांना परत येण्याचं आवाहन केलं जात असतानाच आता बंडखोर आमदारांनी स्वतंत्र गट स्थापन करण्याची तयारी केली आहे. या संदर्भात कालच सह्याही करण्यात आल्याची माहिती गुवाहाटीत असलेले राज्यमंत्री बच्चू कडू यांनी दिली आहे. दरम्यान, या संपूर्ण प्रकारात जवळपास ५० आमदारांचे पाठबळ मिळेल असेही बच्चू कडू यांनी म्हटले आहे.

शिवसेनेने कॉँग्रेस आणि राष्ट्रवादीची साथ सोडून भाजपसोबत सत्ता स्थापन करावी अशी मागणी करत एकनाथ शिंदे यांच्यासह सेनेच्या तब्बल ३३ आमदारांनी बंड पुकारले आहे. हे सर्व आमदार काल सुरतमध्ये होते. त्यानंतर पहाटे हे सर्व आमदार गुवाहाटीत दाखल झाले आहेत. विशेष म्हणजे या सर्वांसोबत राज्यमंत्री बच्चू कडू हेदेखील या बंड नाट्यात सामील झाले आहेत.

सेनेच्या बंडखोर आमदारांमध्ये निधी वाटप आणि अन्य काही मुद्यांवरून नाराजी असल्याचे बच्चू कडू यांनी सांगितले. या सर्व प्रकारानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नाराजी व्यक्त केली असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. दरम्यान, हे सर्व बंड होत असताना बंडखोर आमदारांचा स्वतंत्र गट स्थापन करण्याची तयारी करण्यात आल्याची माहिती बच्चू कडू यांनी दिली आहे. काही कॉँग्रेसचे आमदारही संपर्कात असून जवळपास ५० आमदारांचे पाठबळ मिळेल असेही त्यांनी म्हटले आहे.

एकूणच या राजकीय पेचामुळे शिवसेनेपूढे गहन प्रश्न निर्माण झाला आहे. अशातच एकनाथ शिंदे पुन्हा परत येतील असे सांगितले जात असतानाच स्वतंत्र गट स्थापन करण्याची तयारी करण्यात आली आहे. त्यामुळे शिवसेनेची विशेषत: मुख्यमंत्र्यांची चांगलीच अडचण झाली आहे.


ह्याचा प्रसार करा
महाराष्ट्र
Back to top button
Contact Us