Site icon Aapli Baramati News

BIG BREAKING : मुख्यमंत्र्यांच्या बारामती द्वेषावर शिक्कामोर्तब; बिबट सफारी प्रकल्प केला रद्द..!

ह्याचा प्रसार करा

बारामती : प्रतिनिधी

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सत्तेत आल्यानंतर बारामतीबद्दल असलेला द्वेष वारंवार दिसून आला आहे. यापूर्वी बारामती नगरपरिषदेचा निधी रोखल्यानंतर आता मुख्यमंत्र्यांनी बारामतीत होणारा बिबट सफारी प्रकल्पही रद्द केल्याचे ट्विट केले आहे. दरम्यान, याबाबत अजितदादांशी चर्चा करून एकत्रितपणे मुख्यमंत्र्यांची भेट घेऊ अशी प्रतिक्रिया खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली आहे.

बारामती तालुक्यातील गाडीखेल परिसरात बिबट सफारी प्रकल्प उभारण्यात येणार होता. त्याबाबत तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्पात घोषणाही केली होती. मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल हा प्रकल्प रद्द केल्याचे ट्विट केले आहे. त्यामुळे मुख्यमंत्री जाणीवपूर्वक बारामतीतील कामे थांबवत आहेत का असा सवाल उपस्थित होऊ लागला आहे.

बारामतीत होणाऱ्या बिबट सफारीबाबत घोषणा केल्यानंतर जुन्नरचे आमदार अतुल बेनके यांनी अधिवेशनात याबाबत चर्चा घडवत जुन्नरलाही बिबट सफारी प्रकल्पाची मंजूरी मिळवली होती. त्यानंतर आता सत्तांतरानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ट्विट करत जुन्नरमधील प्रकल्प होणार असल्याचे आणि बारामतीतील प्रकल्प रद्द होणार असल्याचे जाहीर केले आहे.

दरम्यान, याबाबत शासकीय निर्णय अथवा परिपत्रक प्राप्त झाले नसल्याची माहिती वन परिक्षेत्र अधिकारी शुभांगी लोणकर यांनी दिली आहे. दुसरीकडे याबाबत खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. याबाबत आपण अजितदादांशी बोलून एकत्रितपणे मुख्यमंत्र्यांची भेट घेऊ असे सुप्रिया सुळे यांनी सांगितले आहे.


ह्याचा प्रसार करा
Exit mobile version