आपली बारामती न्युज - बारामती व परिसरातील बातम्या देणार हक्काचे व्यासपीठ !
महाराष्ट्र

BIG BREAKING : स्वातंत्र्यदिनी पुण्यात झेंडा फडकणार चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते; राज्य शासनाकडून जिल्हानिहाय यादी जाहीर..!

महाराष्ट्र
ह्याचा प्रसार करा

मुंबई : प्रतिनिधी

राज्यात येत्या स्वातंत्र्यदिनी होणाऱ्या ध्वजारोहण कार्यक्रमाबाबत राज्य शासनाकडून यादी जाहीर करण्यात आली आहे. कोणत्या जिल्ह्यात, कुणाच्या हस्ते ध्वजारोहण होणार याबाबतचे निर्देश मुख्यमंत्री कार्यालयाद्वारे देण्यात आले आहेत. त्यानुसार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नागपूरमध्ये ध्वजारोहण होणार असून मंत्री चंद्रकांत पाटील हे पुण्यात झेंडा फडकवणार आहेत. तर जिथे मंत्री नाहीत, त्या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत ध्वजारोहण केले जाणार आहे.

मुख्यमंत्र्यांचे अप्पर मुख्य सचिव भूषण गगराणी यांनी याबाबतचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत नागपूरमध्ये, चंद्रपूरमध्ये मंत्री सुधीर मनगुंटीवार, पुण्यात चंद्रकांत पाटील, अहमदनगरमध्ये राधाकृष्ण विखे पाटील, नाशिकमध्ये गिरीश महाजन, धुळे येथे दादाजी भुसे, जळगावमध्ये गुलांबराव पाटील, ठाण्यात रवींद्र चव्हाण, मुंबई उपनगरात मंगलप्रभात लोढा, सिंधुदुर्गमध्ये दीपक केसरकर, रत्नागिरीमध्ये उदय सामंत, परभणीत अतुल सावे, औरंगाबादमध्ये संदीपान भूमरे, सांगलीत सुरेश खाडे, नंदुरबारमध्ये विजयकुमार गावीत, उस्मानाबादमध्ये तानाजी सावंत, साताऱ्यात शंभुराज देसाई, जालन्यात अब्दुल सत्तार आणि यवतमाळमध्ये संजय राठोड यांच्या हस्ते ध्वजारोहण कार्यक्रम होणार आहे.

उर्वरीत जिल्ह्यांमध्ये जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. तर अमरावतीमध्ये विभागीय आयुक्तांच्या हस्ते ध्वजारोहण पार पडणार आहे. दरम्यान, मंत्रीमंडळ विस्तारानंतर शिंदे सरकारकडून अद्याप खातेवाटप झालेले नाही. त्यातच पालकमंत्रीपदाची जबाबदारीही देण्यात आलेली नाही. त्यामुळे आता ऐन स्वातंत्र्यदिनाच्या तोंडावर ध्वजारोहणाबाबत जिल्हानिहाय यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे.


ह्याचा प्रसार करा
महाराष्ट्र
Back to top button
Contact Us