Site icon Aapli Baramati News

Big Breaking : राष्ट्रवादीच्या आमदार आणि खासदारांचे एक महिन्याचे वेतन पूरग्रस्तांसाठी : उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती

ह्याचा प्रसार करा

सांगली : प्रतिनिधी

राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या खासदार आणि आमदारांचे एक महिन्याचे वेतन पूरग्रस्तांसाठी देण्यात येणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज दिली. पूरग्रस्त भागांत अधिकाधिक तत्परतेने मदत पोहोचावी यासाठी प्रशासन दक्ष असल्याची ग्वाहीही त्यांनी दिली.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज सांगली जिल्ह्यातील पूर स्थितीची पाहणी केली. जलसंपदा मंत्री जयंत पाटील, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार, राज्यमंत्री विश्वजीत कदम आदी मान्यवरांसह प्रशासकीय अधिकारी या दौऱ्यात सहभागी झाले आहेत.

पूरग्रस्तांना तत्पर मदत मिळावी यासाठी प्रशासन प्रयत्न करीत असल्याचे सांगून अजित पवार यांनी पूरग्रस्तांच्या मदतीसाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या आमदार आणि खासदारांचे एक महिन्याचे वेतन देण्यात येणार असल्याचे जाहीर केले. संकट काळात महाराष्ट्रातील जनतेला वाऱ्यावर सोडणार नाही. त्यांना अधिकाधिक मदत देण्यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचेही त्यांनी सांगितले.


ह्याचा प्रसार करा
Exit mobile version