आपली बारामती न्युज - बारामती व परिसरातील बातम्या देणार हक्काचे व्यासपीठ !
पुणेमहानगरेमहाराष्ट्र

Big Breaking : यवत पोलिसांची मोठी कारवाई; ३० लाखांच्या गांजासह १२ जणांना अटक

पुणे
ह्याचा प्रसार करा

दौंड : प्रतिनिधी  

आंध्रप्रदेश आणि कर्नाटककडून पुण्याकडे जाणाऱ्या दोन ट्रकमधून १६७ किलो गांजा जप्त करण्यात आला आहे. पुणे-सोलापूर राष्ट्रीय मार्गावरील पाटस गावाजवळ पोलिसांनी ही कारवाई केली आहे. यामध्ये दोन ट्रक, गांजा असा ७८ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून १२ जणांना अटक करण्यात आल्याची माहिती पोलिस निरीक्षक नारायण पवार यांनी दिली.

याबाबत यवत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, आंध्रप्रदेश आणि कर्नाटकमधून मोठ्या प्रमाणात गांजा पुण्यात विक्रीसाठी नेला जाणार असल्याची माहिती पोलिस निरीक्षक नारायण पवार यांना मिळाली होती. त्यानुसार त्यांनी रविवारी रात्री दोन पथके तैनात करून छापा टाकण्याची व्यूहरचना आखली. पाटसजवळील एका पेट्रोलपंपसह राजश्री हॉटेलच्या विरुद्ध बाजूला अशी दोन पथके तैनात करण्यात आली.

रात्री दीड वाजण्याच्या सुमारास दोन ट्रक पुण्याकडे जाताना पोलिसांनी त्यांना थांबवले. त्यांची झडती घेतल्यानंतर चालकाच्या सीटच्या बाजूलाच सहा पिशव्यांमध्ये गांजा भरलेली पाकिटे आढळून आली. सुमारे ३० लाख १० हजार रुपये किमतीचा १६७ किलो गांजा आणि दोन ट्रक असा ७८ लाख १० हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.

या प्रकरणी रवीकुमार जागेश्वरराव पुपल्ला, रवी कॉटया अजमेरा (दोघेही रा. क्रिष्णा, आंध्रप्रदेश), उमेश खंडू थोरात (रा. मंचर), युवराज किसन पवार (रा. मुथळा, जि. बुलढाणा), उत्तम काळू चव्हाण (रा. करवंड, बुलढाणा), प्रकाश एन व्यंकटेशराव (रा. विजयवाडा, आंध्रप्रदेश), किसन शालीमार पवार (रा. मुथळा, जि. बुलढाणा), रुक्मिणी रुपराव पवार मीना युवराज पवार, ललिता हिरालाल पवार (सर्व रा.ढाकरखेड, बुलढाणा), ममता उत्तम चव्हाण (रा. करवंड, बुलढाणा), लालाबाई देवीलाल चव्हाण (रा. चिखली, बुलढाणा) अशा सात पुरुष आणि पाच महिलांना अटक केली आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक नारायण पवार हे करीत आहेत.

जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, अतिरिक्त पोलिस अधीक्षक मिलिंद मोहिते, उपविभागीय पोलिस अधिकारी राहुल धस यांच्या मार्गदर्शनाखाली यवत पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक नारायण पवार, सहाय्यक पोलिस निरीक्षक केशव वाबळे, पोलिस उपनिरीक्षक पद्मराज गंपले, कर्मचारी गणेश सोनवणे, विशाल गजरे, विकास कापरे, जे. एम. भोसले, भानुदास बंडगर, रवींद्र गोसावी, मेघराज जगताप, महेंद्र चांदणे, नूतन जाधव, प्रमोद गायकवाड, सुजीत जगताप, दीपक यादव, तात्याराम करे, गणेश मूटेकर, आनंद आहेर, महिला पोलिस धावडे, सत्यवान जगताप, विजय आवाळे, पोलिस मित्र रामा पवार, निखिल अवचट यांनी ही कारवाई केली.    


ह्याचा प्रसार करा
पुणे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Contact Us