Site icon Aapli Baramati News

Big Breaking : नवाब मलिक यांना ईडीकडून अटक; मलिक म्हणाले, लढेंगे.. नही झुकेंगे ..!

ह्याचा प्रसार करा

मुंबई : प्रतिनिधी

अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांच्या घरावर आज ईडीने धाड टाकत सकाळी त्यांना ताब्यात घेतले. त्यानंतर मलिक यांना अटक करण्यात आली आहे. सकाळपासूनच मलिक यांच्यावरील कारवाईमुळे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. त्यामुळे मलिक यांच्या अटकेनंतर ईडी कार्यालय परिसरात बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.

आज सकाळी ईडीने नवाब मलिक यांच्या घरावर धाड टाकत त्यांना ताब्यात घेतले. त्यानंतर आता दुपारी नवाब मलिक यांना अटक करण्यात आली आहे.  त्यांना वैद्यकीय तपासणीसाठी नेण्यात आले आहे. यावेळी नवाब मलिक यांनी लढेंगे.. नही झुकेंगे, सबको एक्सपोज करेंगे असे म्हणत ईडीच्या कारवाईवर प्रतिक्रिया दिली आहे. या अटकेच्या कारवाईनंतर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत.

तब्बल सात तासांच्या चौकशीनंतर नवाब मलिक यांना अटक करण्यात आली आहे. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहीमशी संबंध असल्याचा दावा ईडीने केला आहे.  दरम्यान, कार्यकर्त्यांचा आक्रमकपणा लक्षात घेऊन ईडी कार्यालय परिसरात बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. ईडी कार्यालयाबाहेर पोलिसांसह सीआरपीएफ जवानही तैनात करण्यात आले आहेत. त्यामुळे या परिसराला पोलिस छावणीचे स्वरूप प्राप्त झाले आहे.    


ह्याचा प्रसार करा
Exit mobile version