Site icon Aapli Baramati News

Big Breaking : खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह सर्वच कुटुंबाला कोरोना; रेवती आणि विजय सुळेही पॉझिटिव्ह..!

ह्याचा प्रसार करा

मुंबई : प्रतिनिधी

आज दुपारी खासदार सुप्रिया सुळे आणि त्यांचे पती सदानंद सुळे यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले होते. त्यानंतर आता सुप्रिया सुळे यांच्या कन्या रेवती आणि पुत्र विजय यांचेही कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे संपूर्ण सुळे कुटुंबीयांना कोरोनाची बाधा झाली आहे.

आज दुपारीच खासदार सुप्रिया सुळे यांनी स्वत:सह पती सदानंद सुळे यांचा कोरोना  अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती दिली होती. त्यानंतर आता सुप्रिया सुळे यांच्या कन्या रेवती आणि पुत्र विजय यांनाही कोरोनाची लागण झाली असल्याची माहिती पुढे आली आहे.

सुप्रिया सुळे यांनी संपर्कात आलेल्या व्यक्तींनी स्वत:ची तपासणी करून काळजी घेण्याचे आवाहनही केले आहे. तसेच दोघांची प्रकृती स्थिर असल्याचेही त्यांनी ट्विटरद्वारे सांगितले होते. त्यानंतर त्यांची दोन्ही मुलेही कोरोना पॉझिटिव्ह आली आहेत.  


ह्याचा प्रसार करा
Exit mobile version