मुंबई : प्रतिनिधी
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल अपशब्द वापरणे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना भोवले आहे. या प्रकरणात नारायण राणे यांना अटक करण्यात आली आहे. दरम्यान, मुंबई उच्च न्यायालयाने राणे यांनी अटकपूर्व जामिनासाठी दाखल केलेल्या अर्जावर तातडीने सुनावणी घेण्यास नकार देत अर्ज फेटाळला. त्यामुळे त्यांना अटक करण्यात आली आहे.
मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याबद्दल नारायण राणे यांनी अपशब्द वापरले होते. त्यानंतर राज्यभरात याचे पडसाद उमटले. अनेक ठिकाणी राणे यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले. त्यामुळे त्यांना अटक होणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज रत्नागिरी सत्र न्यायालयाने फेटाळला आहे. सत्र न्यायालयाच्या या निर्णयाविरोधात नारायण राणे यांनी आता उच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यावर तातडीने सुनावणी घेण्यास उच्च न्यायालयाने नकार दिला.
नारायण राणेंना अटक करण्यापूर्वी रत्नागिरी पोलीस अधिक्षकांनी सुमारे तासभर नारायण राणेशी चर्चा केली. त्यावेळी नितेश राणे, प्रसाद लाड आणि इतर भाजप नेते या ठिकाणी उपस्थित होते.