मुंबई : प्रतिनिधी
कोरोनाचा वाढता प्रसार रोखण्यासाठी राज्य शासनाने आता नविन निर्बंध लागू केले आहेत. उद्या मध्यरात्रीपासून या निर्बंधांची अंमलबजावणी केली जाणार आहे. नव्या नियमांनुसार मैदाने, उद्याने, पर्यटन स्थळे बंद राहणार असून रात्री ११ ते पहाटे ५ वाजेपर्यंत नाईट कर्फ्यु लागू केला जाणार आहे.
राज्य शासनाने आज नवीन निर्बंध जाहिर केले आहेत. उद्या मध्यरात्रीपासून हे निर्बंध लागू होणार आहेत. नव्या निर्बंधांनुसार रात्री ११ ते पहाटे ५ वाजेपर्यंत नाईट कर्फ्यू असेल. तर मैदाने, उद्याने, पर्यटन स्थळे बंद राहणार आहेत. रेस्टॉरंट, नाट्यगृहे, चित्रपटगृहे ५० टक्के क्षमतेने रात्री १० पर्यंतच सुरु ठेवता येतील.
कोरोना लसीचे दोन डोस पूर्ण झालेल्या व्यक्तींनाच सार्वजनिक वाहतूक सेवेचा लाभ मिळणार आहे. राज्यातील शाळा आणि कॉलेजेस १५ फेब्रुवारीपर्यंत बंद राहणार आहेत. खासगी कंपन्यांमध्ये २ डोस घेतलेल्या कर्मचारी आणि अभ्यागतांना परवानगी असेल. तसेच खासगी कार्यालये ५० टक्के क्षमतेने सुरू राहतील.