Site icon Aapli Baramati News

Big Breaking : ज्येष्ठ गायिका लता मंगेशकर यांना कोरोनाचा संसर्ग

ह्याचा प्रसार करा

मुंबई : प्रतिनिधी

ज्येष्ठ गायिका लता मंगेशकर यांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यांना मुंबईतील ब्रीच कॅन्डी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती सध्या स्थिर असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली आहे.

श्वसनाचा त्रास होत असल्याने लता मंगेशकर यांची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये त्यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे समोर आले आहे. तसेच काही प्रमाणात न्यूमोनियाचीही लक्षणे आढळून आली आहेत. त्यामुळे त्यांना ब्रीच कॅन्डी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.

लता मंगेशकर यांची प्रकृती सध्या चांगली असून केवळ खबरदारीचा उपाय म्हणून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचेही सांगण्यात आले. दरम्यान, महाराष्ट्रात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे राज्यात निर्बंधही लागू करण्यात आले आहेत.


ह्याचा प्रसार करा
Exit mobile version