पुणे : प्रतिनिधी
राज्यातील महिला नेत्यांविषयी वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर बंडातात्या कराडकर काही दिवसांपूर्वी चर्चेत आले होते. परंतु त्यांनी आता पुन्हा एकदा महात्मा गांधी यांच्याबद्दल वादग्रस्त केले आहे. महात्मा गांधीबद्दल बोलत असताना त्यांनी गांधीजींचा म्हातारा असा एकेरी उल्लेख केला आहे. त्यामुळे नवा वाद होण्याची शक्यता आहे.
क्रांतीकारक भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांच्या शहीददिनी त्यांनी दिलेल्या प्रवचनात गांधीजींच्या अहिंसेच्या तत्वावर त्यांनी टीका केली आहे. भगतसिंग यांच्या मनावर इतका परिणाम झाला होता की या म्हाताऱ्याच्या मार्गाने जायचे काही कारणच नाही, हा विचार होता. त्यानंतर भगतसिंग क्रांतिकारक बनल्याचे कराडकर यांनी सांगितले.
आपण जर या म्हाताऱ्याच्या पद्धतीने जर स्वातंत्र्य मिळवायचे असेल तर एक हजार वर्ष स्वातंत्र्य लागतील, असे लोकमान्य टिळक म्हणत होते असा दावा बंडातात्या कराडकर यांनी केला. १९४७ साली आपल्याला अहिंसेच्या मार्गाने स्वातंत्र्य मिळाले नाही, हे आपल्याला माहीतच आहे. १९४२ साली सुरू झालेल्या क्रांतिकारक चळवळीमुळे इंग्रजांनी भारत सोडण्याचा निर्णय घेतला आहे, असेही ते म्हणाले.