Site icon Aapli Baramati News

बच्चू कडू यांना मातृशोक; बच्चू कडू झाले भावूक, म्हणाले..

ह्याचा प्रसार करा

अमरावती : प्रतिनिधी

प्रहार संघटनेचे अध्यक्ष आणि राज्यमंत्री बच्चू उर्फ ओमप्रकाश कडू यांच्या मातोश्री इंदिराबाई कडू यांचे आज प्रदीर्घ आजाराने  निधन झाले आहे. चांदुरबाजार तालुक्यातील बेलोरा येथे राहत्या घरी वयाच्या ८४ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. मागील काही दिवसांपासून त्यांच्यावर उपचार चालू होते. अखेर त्यांची आज प्राणज्योत मावळली. ही दुःखद बातमी मिळताच बच्चू कडू त्यांच्या गावातील राहत्या घरी पोहोचले आहेत.

बच्चू कडू यांनी दुखद भावना व्यक्त करत ट्विट केले आहे. माझ्या आयुष्याला योग्य वळण देणारी, माझी आई स्व. इंदिराबाई बाबाराव कडु यांचे ८४व्या वर्षी प्रदीर्घ आजाराने निधन झाले आहे. त्यांच्यावर उद्या  रविवारी सकाळी १० वाजता बेलोरा ता. चांदुर बाजार जि. अमरावती येथे अंत्यसंस्कार पार पडणार आहेत, असे त्यांनी आपल्या ट्विटमध्ये नमूद केले आहे.

बच्चू कडू यांना प्रथमच राज्य मंत्रिमंडळात स्थान मिळाले. त्यांच्यावर राज्यमंत्री पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. बच्चू कडू यांच्या शपथविधी सोहळ्यासाठी त्यांच्या मातोश्री इंदिराबाई कडू उपस्थित होत्या. त्या नेहमी बच्चू कडू यांच्यासोबत प्रचारासाठी असायच्या.


ह्याचा प्रसार करा
Exit mobile version