Site icon Aapli Baramati News

विरोधी पक्षनेतेपदी अजितदादांचं नाव निश्चित; औपचारिक घोषणा बाकी

ह्याचा प्रसार करा

मुंबई : प्रतिनिधी

विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी अपेक्षेनुसार माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची निवड निश्चित झाली आहे. विधानसभा अध्यक्षांना याबाबत पत्र देण्यात आले असून लवकरच अधिकृत घोषणा केली जाणार आहे.

विरोधी पक्षनेतेपदासाठी राष्ट्रवादीमध्ये अजित पवार आणि जयंत पाटील यांची नावे चर्चेत होती. याबाबत काल ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी आमदारांची बैठक घेत त्यांची मते जाणून घेतली. त्यामध्ये अजित पवार यांच्या नावाला पाठिंबा दर्शवण्यात आला. आज शिंदे सरकारचा विश्वासदर्शक ठराव मंजूर झाल्यानंतर पक्षाकडून अजित पवार यांच्या विरोधी पक्षनेतेपदाच्या निवडीबाबत पत्र विधानसभा अध्यक्षांना देण्यात आले. अजितदादांच्या निवडीबाबत अधिकृत घोषणा अद्याप बाकी आहे.

अजितदादांचा प्रशासनावर मजबूत पकड आणि दबदबा राहिला आहे. सत्तांतरानंतर झालेल्या विशेष अधिवेशनात अजितदादांची फटकेबाजी चर्चेत राहिली. विरोधकांना खास शैलीत चिमटे काढत अजितदादांनी सभागृह गाजवले. विरोधी पक्षनेते म्हणून काम करताना आता सत्ताधाऱ्यांना अजितदादांचा घणाघात सोसावा लागणार आहे.


ह्याचा प्रसार करा
Exit mobile version