Site icon Aapli Baramati News

Agriculture Bill : युवा नेते पार्थ पवार यांनी केलं केंद्राच्या निर्णयाचं स्वागत; म्हणाले, हा शेतकरी एकतेचा विजय

ह्याचा प्रसार करा

बारामती : प्रतिनिधी

केंद्र सरकारने लागू केलेले तीनही कृषी कायदे रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचं स्वागत करत राष्ट्रवादीचे युवा नेते पार्थ पवार यांनी हा शेतकरी एकतेचा विजय असल्याचे म्हटले आहे. यासंदर्भात ट्विट करत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

केंद्र सरकारने लागू केलेले तीन कृषी कायदे रद्द करण्याचा निर्णय घेतल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केली. त्यानंतर विविध स्तरातून प्रतिक्रिया यायला सुरुवात झाली आहे. राष्ट्रवादीचे युवा नेते पार्थ पवार यांनीही या निर्णयाबद्दल आपली प्रतिक्रिया ट्विटरद्वारे व्यक्त केली आहे.

पार्थ पवार यांनी या निर्णयाचे स्वागत करतानाच शेतकऱ्यांनी सामूहिकपणे केलेल्या संघर्षाचा विजय असल्याचे म्हटले आहे. शेतकऱ्यांच्या आक्रमकतेमुळे केंद्र सरकारला हे जाचक कायदे रद्द करावे लागल्याचेही त्यांनी आपल्या ट्विटमध्ये नमूद केले आहे.

गेल्या वर्षभरापासून शेतकऱ्यांनी हे तीन कायदे रद्द करावेत या मागणीसाठी दिल्लीच्या सीमेवर आंदोलन सुरु ठेवले आहे. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर देशभरात संतप्त प्रतिक्रिया उमटत होत्या. देशभरात अनेक ठिकाणी शेतकऱ्यांनी मोर्चे काढून या आंदोलनाला पाठिंबा दिला होता.


ह्याचा प्रसार करा
Exit mobile version