Site icon Aapli Baramati News

अभिनेत्री कतरिना कैफला कोरोनाची लागण

ह्याचा प्रसार करा

मुंबई : प्रतिनिधी

एकीकडे राज्यभरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना बॉलीवूडमध्येही कोरोनाचे संकट गडद होताना दिसत आहे. आता कतरिना कैफ हिलाही कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. कोरोनाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर तिने स्वतःला आयसोलेट केले आहे. सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत कतरिनाने तिला कोरोना संसर्ग झाल्याची माहिती दिली आहे.

काही दिवसांपूर्वी अक्षय कुमार, गोविंदा, भूमी पेडणेकर आणि विकी कौशल आदी अभिनेत्यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर आता अभिनेत्री कतरिना कैफ हिलादेखील कोरोनाची लागण झाली आहे. याबाबत कतरिनाने सोशल मिडियात पोस्ट टाकून कोरोना पॉझिटिव्ह असल्याची माहिती दिली असून संपर्कातील सर्वांनीच तपासणी करण्याचे आवाहन केले आहे.

कतरिनाने आपल्या पोस्टमध्ये म्हणते, ‘माझी कोविड 19 ची टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. मी स्वतःला आयसोलेट केले असून होम क्वारंटाइन आहे आणि सर्व नियमांचे पालन करत आहे. सोबतच संपर्कात आलेल्या सर्वांनी कोरोना चाचणी करुण घेण्याचे आणि  चाहत्यांना स्वतःची काळजी घेण्याचे आवाहनही तिने केले आहे.


ह्याचा प्रसार करा
Exit mobile version