आपली बारामती न्युज - बारामती व परिसरातील बातम्या देणार हक्काचे व्यासपीठ !
पिंपरी-चिंचवडपुणेमहानगरेमहाराष्ट्र

Accident : पुणे-मुंबई महामार्गावर भीषण अपघात; पाच जण ठार

पिंपरी-चिंचवड
ह्याचा प्रसार करा

पुणे : प्रतिनिधी

जुन्या पुणे मुंबई महामार्गावर कार आणि कंटेनरचा अपघात झाला आहे. हा अपघात इतका भीषण होता की, त्यात पाच जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. या मृतांची ओळख अजून पटलेली नसून ग्रामस्थांकडून माहिती मिळवण्याचे काम पोलिस करत आहेत.

जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर लोणावळाजवळ असलेल्या शिलाटने गावाजवळ सकाळी आठच्या सुमारास हा अपघात झाला. अपघातातील कार मुंबईवरून पुण्याच्या दिशेने येत होती. कारचा वेग जास्त असल्याने चालकाचा कारवरील ताबा सुटला. त्यामुळे कार दुभाजक ओलांडून दुसऱ्या विरुद्ध दिशेला गेली. त्यामुळे कारची समोरून येणाऱ्या कंटेनरला जोरदार धडक बसली. 

ही धडक इतकी जोरदार होती की त्यामध्ये कारमधील पाच जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. कारचा चुराडा झाल्यामुळे मृतांची ओळख पटली नसून पोलीस त्यांची ओळख पटवण्याचे काम करत आहेत. या अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी लगेच पोलिस यंत्रणा आणि ग्रामस्थांनी धाव घेतली. काही वेळ अपघातामुळे या मार्गावर वाहतुकीची कोंडी झाली होती.


ह्याचा प्रसार करा
पिंपरी-चिंचवड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Contact Us