Site icon Aapli Baramati News

गर्दीतून महिलांना सन्मानाने वाट काढून दिली तरीही गुन्हा दाखल होतो तो पुरुष; जितेंद्र आव्हाडांची भावनिक पोस्ट

ह्याचा प्रसार करा

मुंबई : प्रतिनिधी

आज जागतिक पुरुष दिन आहे. मोठ्या प्रमाणात प्रसारमाध्यमांवर पोस्ट करत पुरुष दिन साजरा होत आहे. अशातच राष्ट्रवादीचे नेते माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी देखील जागतिक पुरुष दिनानिमित्त ट्विटरवर भावनिक पोस्ट करत गर्दीतून महिलांना सन्मानाने वाट काढून दिली तरीही गुन्हा दाखल होतो तो पुरुष … अशी खंत व्यक्त केली.

‘काबाडकष्ट करत मुलाबाळांना घडवतो तो,स्वतः उपाशी राहत इतरांना भरवतो तो, हलाखीत दिवस काढत मुलांनी शिकावं यासाठी झटतो तो, हलाखीचे दिवस काढत इतरांचे स्वप्न पूर्ण करतो तो आणि गर्दीतून महिलांना सन्मानाने वाट काढून दिली तरीही गुन्हा दाखल होतो तो पुरुष’ असे जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले आहे.

नुकतेच जितेंद्र आव्हाड यांच्यावर एका महिलेने विनयभंगाची तक्रार दाखल केली होती. त्यानंतर जितेंद्र आव्हाड भावनिक झाल्याचे पाहायला मिळाले. एका कार्यक्रमाच्या वेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटण्यासाठी एक महिला गर्दीतून पुढे येत होती. त्यावेळी जितेंद्र आव्हाड यांनी महिलेला गर्दीतून बाजूला केले. त्यामुळे त्या महिलेने जितेंद्र आव्हाड यांनी माझ्या शरीराला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला असल्याचा दावा करत विनयभंगाची तक्रार दाखल केली .


ह्याचा प्रसार करा
Exit mobile version