Site icon Aapli Baramati News

सोलापूर-विजापूर रस्त्यावर काळजाचा ठोका चुकवणारा भीषण अपघात; ४ जणांचा जागीच मृत्यू

ह्याचा प्रसार करा

सोलापूर : प्रतिनिधी

सोलापूर- विजापूर रस्त्यावर भीषण अपघात झाला आहे. चालकाचे नियंत्रण सुटल्याने एक्सयुव्ही कार एका पूलाला धडकून झालेल्या या अपघातात ४ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर एकजण गंभीररीत्या जखमी झाला आहे. मंगळवारी पहाटे हा अपघात झाला.

याबाबत मिळालेली माहिती अशी की,  सोलापूर-विजापूर रस्त्यावर एका पुलाचे बांधकाम सुरू आहे. मंगळवारी पहाटे एका एक्सयुव्ही कारने या पूलाला धडक दिली. त्यामध्ये कारमधील चौघेजण जागीच ठार झाले आहेत. तर एकजण गंभीर जखमी झाला आहे. अरूण कुमार लक्ष्मण, मेहबुब मोहम्मद अली मुल्ला, फिरोज सैफसाब शेख, मुन्ना केंभावे अशी अपघातात मृत पावलेल्यांची नावे आहेत. हे  सर्वजण विजापूर जिल्ह्यातील सिंदगी तालुक्यातील केंडी येथील रहिवासी आहेत.

सोलापूर-विजापूर रस्त्यावरील पूलाचे काम सध्या सुरु आहे. मंगळवारी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास सोलापूरकडे निघालेली एक्सयुव्ही कार थेट या पूलाला धडकली. त्यामध्ये चौघेजण जागीच ठार झाले आहेत. तर एकजण जखमी झाला आहे.


ह्याचा प्रसार करा
Exit mobile version