Site icon Aapli Baramati News

…सुसंवाद आज पाहायला मिळत नाही : शरद पवार यांची खंत

ह्याचा प्रसार करा

मुंबई : प्रतिनिधी

‘त्याकाळात मृणालताई सदनामध्ये असताना अनेकदा वाद होत असत. तेव्हाचे वाद राज्याचे हितसंबंधी असत. तो एक सुसंवाद असायचा. परंतु आता असे संवाद पाहायला मिळत नाही. आता कोथळा काढण्याची भाषा होत आहे, अशी खंत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि खासदार शरद पवार यांनी व्यक्त केली . ते मृणालताई गोरे दालनाच्या उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते.

केशव गोरे स्मारक ट्रस्टच्या वतीने आयोजित केलेल्या मृणालताई गोरे दालनाचे उद्घाटन पवार यांच्या हस्ते झाले.’मृणालताई गोरे दालन, संघर्षाचा कलात्मक आविष्कार’ असे या कार्यक्रमाचे स्वरूप होते . या कार्यक्रमास उद्योगमंत्री सुभाष देसाई, ज्येष्ठ समाजसेवक बाबा आढाव यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते. यावेळी बोलताना शरद पवार यांनी मृणालताई यांच्या आठवणींना उजाळा दिला. महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनामध्ये अनेकांनी मोठ्या प्रमाणात प्रचंड योगदान दिले आहे. यात  आपल्याला अनेकांची आठवण होत असते. यामध्ये मृणालताईंचे नाव आल्याशिवाय राहत नाही, असे पवार यांनी नमूद केले.

शरद पवार म्हणाले की, मृणालताईंनी आपले वैद्यकीय शिक्षणाचे क्षेत्र सोडून घरातील हांडे, लाटणे आणि थाळी यांसारखे हत्यारे घेऊन सामाजिक जीवनावर उपचार करण्यासाठी उभा केलेला त्यांच्या समाजवादी चळवळीतील झंझावताचा  कलाविष्कार त्यांच्या संघर्षाचा प्रवास नव्या पिढीला ओळख दाखवणारा व प्रेरणादायी ठरेल. मृणालताईंना कलादालनाच्या रूपाने दिलेली ही खरी श्रद्धांजली ठरेल, असेही त्यांनी नमूद केले.


ह्याचा प्रसार करा
Exit mobile version