मातोश्रीवरील चौघांसाठी ईडीची नोटीस तयार
मुंबई : प्रतिनिधी
भाजप नेते केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी एक ट्विट करत राज्यात खळबळ उडवून दिली आहे. सुशांतसिंग राजपूत आणि दिशा सालियन यांची आत्महत्या नाही, हत्याच आहे असा दावा त्यांनी केला आहे. तसेच मातोश्रीवरील चौघांसाठी ईडीची नोटीस तयार आहे असे खळबळजनक ट्विट नारायण राणे यांनी केले आहे.
नारायण राणे यांनी ट्विटमध्ये म्हटले की, खासदार विनायक राऊत यांच्यासाठी खास बातमी आहे. लवकरच सुशांतसिंग प्रकरण आणि सामुदायिक बलात्कार करून जिची हत्या केली त्या दिशा सालियन या दोघांची आत्महत्या नव्हे हत्या झाली. त्यांचीही चौकशी परत होईल.
नारायण राणे यांनी ट्विटमध्ये शिवसेनाप्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानाचा उल्लेख केला आहे. मातोश्रीच्या चौघांसाठी ईडीची नोटीस तयार असल्याचे मला कळाले, असेही राणे यांनी म्हटले आहे. त्यामुळे मातोश्रीवरील नेमक्या कुणाला ईडीची नोटीस जाते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.