Site icon Aapli Baramati News

सुनील तटकरे हे राष्ट्रवादी नाही, तर कुटुंबवादी आहेत : आमदार भास्कर जाधव

ह्याचा प्रसार करा

रत्नागिरी : प्रतिनिधी

एकेकाळी एकाच पक्षात असलेल्या खासदार सुनील तटकरे आणि आमदार भास्कर जाधव यांच्यात चांगलाच कलगितुरा रंगला आहे. भास्कर जाधव यांनी मी कुणबी समाजाला विधानपरिषदेची जागा द्या म्हटलो तर त्यांना मिरच्या का झोपल्या ? असा प्रश्न उपस्थित करत सुनील तटकरे हे राष्ट्रवादी नाहीतर कुटुंबवादी आहेतअशी  घणाघाती टीका केली आहे. जर अंगावर आला तर भास्कर जाधव शांत बसणार नाही असा इशाराही त्यांनी दिला आहे.

मंगळवारी पत्रकारांशी संवाद साधताना भास्कर जाधव यांनी सुनील तटकरे यांच्यावर चांगलीच टोलेबाजी केली. भास्कर जाधव म्हणाले, सुनील तटकरे यांनी नेहमी राष्ट्रवादीचे नाव घेत सर्व पदे आपल्या घरात घेऊन कुटुंबवादी राजकारण केले आहे. विधानपरिषदेची जागा कुणबी समाजाला देण्यात यावी, ही मागणी  असताना त्यांना मिरच्या झोंबल्या ?  सगळी राजकीय पदे आपल्या घरात ठेवायची  आणि सर्वसामान्याच्या राजकारणाची राख करायची हेच  धोरण सुनिल तटकरे यांचे राहिलेले आहे.

बोगस कंपन्या काढून गोरगरिबांच्या व शेतकऱ्यांच्या शेकडो एकर जमिनी लुबाडायच्या. हजारो कोटी रुपये कमवायचे. त्यांना नीतिमत्तेची आणि उपकाराची जाण नाही. त्यामुळे सुनील तटकरे यांना मी मार्गदर्शन करू शकत नाही असेही भास्कर जाधव यांनी म्हटले आहे.

यापूर्वीही राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या नेत्यांमधील वाद सर्वांसमोर आला होता. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ आणि शिवसेनेचे नांदगाव येथील आमदार सुहास कांदे यांचा वाद चांगलाच उफाळून आला होता. अशातच आता पुन्हा राष्ट्रवादीचे सुनील तटकरे आणि शिवसेनेचे भास्कर जाधव यांच्यात कलगितुरा रंगला आहे.


ह्याचा प्रसार करा
Exit mobile version