आपली बारामती न्युज - बारामती व परिसरातील बातम्या देणार हक्काचे व्यासपीठ !
महाराष्ट्रमुंबईराजकारण

समय ये बलवान है..; योद्धा ये महान है..! राष्ट्रवादीकडून शरद पवार यांच्यावरील गौरवगीत सोशल मीडियावर लाँच

महाराष्ट्र
ह्याचा प्रसार करा

मुंबई : प्रतिनिधी 

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी कोरोनावर यशस्वी मात केली असून त्यांनी ट्विटद्वारे ही माहिती दिली आहे. या निमित्ताने  पवारसाहेबांच्या ८१ व्या वाढदिवशी, पुण्यातील प्रभारंग फिल्म्स्ने तयार केलेले गाणे राष्ट्रवादी काँग्रेसने सोशल मीडियावर लाँच केले आहे. 

शरद पवार यांनी २४ जानेवारी रोजी ट्विट करुन आपल्याला करोनाची लागण झाल्याची माहिती दिली होती. त्यानंतर शरद पवार यांच्यावर मुंबईतील सिल्व्हर ओक या निवासस्थानी होम क्वारंटाईनमध्ये उपचार सुरु होते. आज त्यांनी कोरोनामुक्त झाल्याची माहिती दिल्याने राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

८१ वर्षांच्या या अजिंक्य योद्ध्याने कोरोनावरदेखील यशस्वी मात केल्याच्या प्रतिक्रिया सोशल मीडियावर व्यक्त होत आहेत. शरद पवार यांच्या याच जिद्दीचे वर्णन करणारे “समय ये बलवान है.. योद्धा ये महान है.. हर अर्जुन का सारथी ये इसकी पहचान हैं।” हे गौरवगीत प्रभारंग फिल्म्स् ने तयार केले आहे.

https://fb.watch/aTBNsYo6Kg/

१२ डिसेंबर २०२१ रोजी नेहरू सेंटर येथे कार्यक्रमात हे गीत प्रदर्शित करण्यात आले होते. त्या वेळी या गीताला मान्यवरांनी पसंती दिली. त्यामुळे शरद पवार हे कोरोनामुक्त झाल्यानंतर चाहत्यांच्या आग्रहास्तव राष्ट्रवादी काँग्रेसने हे गीत सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर लाँच केले आहे.


ह्याचा प्रसार करा
महाराष्ट्र

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दैनिक बातम्या मिळवण्यासाठी सबस्क्राईब करा

नवीन आणि महत्त्वाच्या बातम्यांबद्दल प्रथम शोधा

सबस्क्राईब
Back to top button
Contact Us