Site icon Aapli Baramati News

संजय राऊत म्हणतात; होय..मी राष्ट्रवादीच !

ह्याचा प्रसार करा

मुंबई : प्रतिनिधी

भाजप नेते केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेऊन शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांच्यावर चांगलाच हल्लाबोल केला. नारायण राणे यांनी शिवसेना नेते खासदार संजय राऊत हे राष्ट्रवादीचे असल्याचा आरोप केला होता. या आरोपाला प्रत्युत्तर देताना संजय राऊत यांनी होय मी राष्ट्रवादी, मी प्रचंड राष्ट्रवादी आहे, असे जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.

एवढेच नाही तर २०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपाचे अनेकजण बेरोजगार असणार आहेत, असा टोलाही संजय राऊत यांनी नारायण राणे यांना लगावला आहे. काल संजय राऊत यांनी शिवसेना भवनात पत्रकार परिषद घेऊन भाजपावर अनेक आरोप केले. त्यानंतर भाजप नेते खा.किरीट सोमय्या आणि नारायण राणे यांनी आज पाठोपाठ पत्रकार परिषदा घेतल्या. 

संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी राऊत यांनी नारायण राणे यांनी केलेल्या आरोपांना प्रत्युत्तर दिले. संजय राऊत म्हणाले, माझा डोळा मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर नाही. तर शिवसेनेच्या प्रसारावर आहे. सध्या शिवसेनेचा जोरदार प्रसार चालू आहे. शिवसेनेचा इतका विस्तार वाढला आहे की, येत्या लोकसभेला शिवसेना दिल्लीच्या तख्तापर्यंत पोहोचेल. 

नारायण राणे यांच्या पत्रकार परिषदेला प्रत्युत्तर देण्यासाठी शिवसेना नेते खा. विनायक राऊत यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यामुळे कालपासून एकमेकांवर आरोप करत पत्रकार परिषदेचा सपाटाच सुरू आहे.


ह्याचा प्रसार करा
Exit mobile version