Site icon Aapli Baramati News

संघर्ष करणं ही पवार कुटुंबाची खासियत; दिल्लीच्या तख्तापुढे महाराष्ट्र झुकणार नाही : सुप्रिया सुळे

ह्याचा प्रसार करा

मुंबई : प्रतिनिधी

आयकर विभागाने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बहिणींसह पार्थ पवार यांच्या मुंबईतील कार्यालयावर धाड  टाकली आहे.  या धाड सत्रावर खासदार सुप्रिया सुळे यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. संघर्ष करणं ही पवारांची खासियत आहे. त्यामुळे कितीही काही झालं तरी दिल्लीच्या तख्तापूढे महाराष्ट्र कधी झुकला नाही अन झुकणारही नाही,  अशा शब्दात सुप्रिया सुळे यांनी भाजपला इशारा दिला आहे.

अजित पवार यांच्या कुटुंबातील सदस्यांवर झालेल्या कारवाईबाबत अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. दोन दिवसांपासून हे धाडसत्र सुरू आहे.  या संपूर्ण प्रकारावर खासदार सुप्रिया सुळे यांनी भाष्य केले आहे. ‘महाराष्ट्र कधीही दिल्लीपुढे झुकला नाही आणि कधीच झुकणार नाही’ असे विधान सुप्रिया सुळे यांनी केले. आम्ही संघर्ष करत राहणार आणि संघर्ष करणं हीच पवार कुटुंबियांची खासियत आहे’ असंही त्या म्हणाल्या.

दरम्यान,  सुप्रिया सुळे  महाविकास आघाडी सरकारमधील उध्दव ठाकरे, अजित पवार, बाळासाहेब थोरात यांचे आभार मानले. त्यांनी घटस्थापनेला मंदिरे उघडली आहेत. त्यामुळे खूप चांगले आणि उत्साहाचं वातावरण निर्माण झाले आहे. परंतु, सरकारने जे काही नियम मंदिरासाठी  लागू केले आहेत. ते आपण सगळ्यांनी पाळावेत, असे आवाहनही त्यांनी केले आहे.


ह्याचा प्रसार करा
Exit mobile version