Site icon Aapli Baramati News

विधानसभा अध्यक्ष निवड : आवाजी पद्धतीने निवडणूक घेण्यास राज्यपालांचा विरोध; निवडीबद्दल संभ्रम

ह्याचा प्रसार करा

मुंबई : प्रतिनिधी

विधानसभेच्या अध्यक्षपदाची आवाजी पद्धतीने होणाऱ्या निवडणुकीला राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी विरोध दर्शवला आहे. मंगळवारी दि. २८ डिसेंबर रोजी होणाऱ्या विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी आज अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण करायची होती.परंतु भगतसिंह कोश्यारी यांनी आवाजी पद्धतीने अध्यक्षपदाच्या निवडणुकीला विरोध दर्शवल्याने सरकारपुढे नवीन डावपेच निर्माण झाला आहे.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर हे पद रिक्त आहे. हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच मंगळवारी (दि.२८) अध्यक्षपदाची निवडणूक होत आहे. आवाजी पद्धतीने होत असलेल्या या निवडणुकीला राज्यपालांची मंजुरी आवश्यक आहे. मात्र राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राज्य सरकारला पत्र पाठवत विरोध दर्शवला आहे.

विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक गुप्त मतदान पद्धतीने न घेता आवाजी पद्धतीने घेणे घटनाबाह्य कृती आहे. राज्य सरकार निवडणुक प्रक्रियाच्या नियमात बदल करून निवडणूक घेऊ शकत नसल्याचे भगतसिंह कोश्यारी यांनी म्हटले आहे.  

दरम्यान, रविवारी  (दि.२६) राज्य सरकारकडून महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे आणि अन्नपुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली होती. त्यावेळी राज्यपालांनी अध्यक्षपदाच्या निवडणुकीवर कायदेशीर अभ्यास करून उत्तर देईन, असे कळवले होते. त्यावर आज कोश्यारी यांनी सरकारला आवाजी पद्धतीने अध्यक्षपदाच्या निवडणुकीला विरोध दर्शवला आहे.


ह्याचा प्रसार करा
Exit mobile version